महाराष्ट्राचे टेबलटेनिस खेळाडू बाद फेरीत

वडोदरा – महाराष्ट्राच्या टेबलटेनिस खेळाडूंनी इलेव्हन स्पोर्टस 64 व्या राष्ट्रीय स्कूल गेम्स टेबल टेनिस अजिंक्‍यपद
स्पर्धेत मुलांच्या 19 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुलींच्या सांघिक गटाच्या बाद फेरीत धडक मारली.

स्पर्धेत महाराष्ट्राच्या 19 वर्षाखालील मुलांच्या सांघिक संघाने अ गटात आघाडी घेतली. त्यांनी हिमाचल प्रदेशला देखील त्यांनी याच फरकाने नमविले. त्यांना आसामविरुद्ध चांगलाच घाम गाळावा लागला.विपुल व्यंकटेशने महाराष्ट्राला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर विपुलचा सहकारी गौरव दिनेशला आसामच्या अंकिता सहारिआकडून 1-3 असे पराभूत व्हावे लागले व सामना बरोबरीत आणला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्राच्या जितेंद्र रामस्रीजन याने विजय मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. विपुलने आपला दुसरा सामना जिंकत संघाला बाद फेरीत स्थान मिळवून दिले.तर, 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात मणिपूर संघाला 3-0 अशा फरकाने पराभूत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)