महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर संघाला विजेतेपद

पुणे – महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर संघाने वर्चस्व गाजवून सर्वसाधारण विजेतेपदाचा सलग दुसऱ्यांदा मान मिळविला. प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्याहस्ते विजेत्या संघाला करंडक प्रदान करण्यात आला.

स्वारगेट येथील कै. बाबुराव सणस क्रीडांगणावर तीन दिवसीय स्पर्धेचा समारोप झाला. सर्वाधिक 38 गुण मिळविणाऱ्या कोल्हापूर संघाने सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक पटकाविला. महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्याहस्ते हा करंडक कोल्हापूर संघाला प्रदान करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील 16 परिमंडलाचे औरंगाबाद (जळगाव), लातूर (नांदेड), कल्याण (नाशिक), सांघिक कार्यालय (भांडूप व रत्नागिरी), नागपूर (चंद्गपूर व गोंदिया), अकोला (अमरावती), पुणे (बारामती) व कोल्हापूर अशा 8 संयुक्त संघांतील 592 पुरुष व 176 महिला असे एकूण 768 खेळाडू या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)