साईप्रसाद परदेशी ठरला ‘ज्युनियर पुणे श्री’

पुणे – पुणे जिल्हा हौशी शरिर सौष्ठव संघटनेच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा पातळी ज्युनियर व मास्टर्स पुणे श्री 2018 स्पर्धेत शिवमल्हार जीमच्या साईप्रसाद परदेशीने ज्युनियर पुणे श्री 2018 चा किताब आपल्या नावे केला.

तर, मास्टर्स पुणे श्रीचा मान महादेव बावळे याला देण्यात आला. तसेच यावेळी यावेळी वाई येथे होणाऱ्या ज्युनियर मास्टार्स राज्यस्तरीय स्पर्धेसाठीच्या पुणे संघाची निवड करण्यात आली.

निवडण्यात आलेल्या संघात साईप्रसाद परदेशी, महादेव बावळे, निखील दाभाडे, सुरज गोयर, प्रसाद आधवडे, डॉ. सचिन वानखेडे, संजय कोंडे, मंदार चवरकर यांचा समावेश करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)