न्यूझीलंडच्या विजयात गुप्तिल, निशाम चमकले

श्रीलंकेचा 45 धावांनी पराभव

तौरंगा (न्यूझीलंड) – येथे सुरू असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंके दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 45 धावांनी पराभव करताना तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारीत 50 षटकांत 7 बाद 371 धावांची मजल मारत श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचे आव्हान ठेव्वले. प्रत्युत्तरात फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला 49 षटकांत सर्वबाद 326 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांचा 45 धावांनी पराभव झाला.

यावेळी न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गुप्तिलने 138 धावांची खेली केली. तर, कर्णधार केन विल्यम्सनने 76, रॉस टेलरने 54 आणि जेम्स निशामने 13 चेंडूत 47 धावांची स्फोटक खेळी करत न्युझिलंडला 371 धावांची मजल मारुन दिली. तर, श्रीलंकेकडून निरोशन डिक्वेलाने 50 चेंडूत 76 धावांची खेळी केली. तर, कुसल परेराने 102 धावांची खेळी करत संघाला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)