बाद झाल्यानंतर लोकेश राहुलने केला सराव

सिडनी – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून सिडनीच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या लोकेश राहुलने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. केवळ 9 धावा काढून जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर तो स्लिपमध्ये झेल देऊन माघारी परतला.

गेल्या काही सामन्यांमध्ये धावांचा आटलेला ओघ पाहून आता स्वतः राहूलही चांगलाच चिंतेत आहे. आपली विकेट गेल्यानंतर राहुलने तात्काळ नेट्‌समध्ये सराव करायला सुरुवात केली. त्याच्या या सरावाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर, संघ व्यवस्थापन राहुलला भारतात परत पाठवून त्याला रणजी क्रिकेटमध्ये खेळायला लावणार होते. मात्र, ऐनवेळी संघ व्यवस्थापनाने त्याला आणखी एक संधी देण्याचे ठरवत चौथ्या सामन्यात त्याची निवड करण्यात आली. मात्र, या संधीचाही त्याला पुरेपूर फायदा उचलणे जमले नाही. आणि दुसऱ्याच षटकांत तो बाद झाला. त्यामुळे त्याच्या सरावाचा फोटो आणि व्हिडियो बराच व्हायरल होतो आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)