सार्थक कॉर्पोरेशन संघाला विजेतेपद

पुणे – सोनूकुमार गुप्ताच्या दमदार खेळाच्या जोरावर सार्थक कॉर्पोरेशन संघाने ऍमनोरा संघाला पराभूत करताना एएवायएस सॉफ्टबॉल अकादमी व सिस्का एलइडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सॉफ्टबॉल लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सार्थक कॉर्पोरेशनच्या व्ही. मोहनरावला सर्वोत्तम बॅटर, सार्थक कॉर्पोरेशनच्याच दीपककुमारला सर्वोत्तम पिचर तर व्होटेक्‍सा बॅटरीज संघाच्या कल्पेश कोल्हेला सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अंतिम लढतीमध्ये सार्थक कॉर्पोरेशन संघाने ऍमनोरा संघाला 10-3 असे पराभूत केले. सार्थक कॉर्पोरेशन संघाकडून सोनुकुमार गुप्ताने 3, व्ही. मोहनराव व मानस केशरवानी यांनी प्रत्येकी 2 तर दीपककुमार, आशिषकुमार व डी. रुद्रपती यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना संघाला विजेतेपद मिळवून दिले. ऍमनोरा संघाकडून नरेश निर्मळकर, कृष्णा महानंदा व चंदर तांडी यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना चांगली लढत दिली.

तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये व्होटेक्‍सा बॅटरीज संघाने रचना लाईफस्टाईल संघाला 4-2 असे पराभूत केले. व्होटेक्‍सा बॅटरीज संघाकडून जयेश मोरे, मोहित पाटील, प्रीतीश पाटील, गौरव चौधरी यांनी प्रत्येकी 1 होमरन्स केला. अक्षय कुडवे, सौरव ठोसे यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना रचना लाईफस्टाईल संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये सार्थक कॉर्पोरेशन संघाने व्होटेक्‍सा बॅटरीज संघाला 6-3 असे पराभूत करताना अंतिम फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले.

पी. आशिष, व्ही. मोहनराव, जितेंद्र, बी. रुआरापट्टी, मानस केशरीनमी, दीपक कुमार यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. व्होटेक्‍सा बॅटरीज संघाच्या जयेश मोरे, श्रीराम चौहान व कल्पेश कोल्हे यांनी प्रत्येकी 1 होमरन्स करताना दिलेली लढत अपुरी ठरली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये ऍमनोरा संघाने रचना लाईफस्टाईल संघाला 6-3 असे पराभूत करताना स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)