पुणे – पुणे जिल्हा संघाने पुरुष गटात 103 .5 गुण आणि महिला गटात 119 गुण मिळवून सांघिक विजेतेपदाचे करंडक पटकावले. पण त्याचबरोबर त्यांनी 222.5 गुणांसह वरिष्ठ गटाच्या राज्य मैदानी स्पर्धेत सर्वसाधारण अजिंक्यपदही पटकाविले. ठाणे संघाने 100 गुणांसह सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले. मुंबई येथीन विद्यापीठ मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पुरुष गटात नाशिक जिल्हा संघ (63.5 गुण) तर महिला गटात ठाणे जिल्हा संघ (61 गुण) उपविजेते ठरले. वैयक्तिक प्रकारात पुणे जिल्हा संघाचा या स्पर्धेतील 100 व 200 मी. शर्यत विजेता जयकुमार गावडे याने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला. महिला गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक ठाणे संघाच्या डियांड्रा वालाड्रेस हिला देण्यात आले.