पुणे – टीव्हीएस मोटारस्पोर्टसच्या साहसीवीरांनी सलग सहा तास अखंड चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करीत 25 हजारपेक्षा जास्त उपस्थित असलेल्या चाहत्यांची मने जिंकली. यापूर्वी सलग पाच तास प्रात्यक्षिके करण्याचा विक्रम होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद आशियाई विक्रम नोंदबुकात होणार आहे.
सीझन मॉलमध्ये आयोजित केलेल्या या उपक्रमात कोईमतूर, बंगळुरू, जयपूर, इंदूर, दिल्ली आदी ठिकाणचे साहसपटू सहभागी झाले होते. त्यांनी पिलियन थ्रील राईड, 360 अंशातील फ्रंट राईड, सिंक्रोनाईज फ्लॉवर बर्नआऊट आदी प्रात्यक्षिके केली.