प्रत्येकाने एका मुलाचे करिअर खेळामध्ये करावे – केरीपाळे

देशातील पहिल्या ‘टीचर्स लीग-2019’ चे उद्‌घाटन

पुणे – देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या एका मुलाचे करिअर खेळामध्ये करावे. खेळात जिंकणे-हरणे हे महत्वाचे नसते. परंतु एक चांगला व्यक्ती म्हणून यातून घडला जातो. तसेच खेळात डायट हा अत्यंत महत्वाचा भाग असल्याने सदैव तुमचा उत्साह टिकूण राहतो असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू व छत्रपती पुरस्कार विजेती सायली केरीपाळे यांनी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आंतर महाविद्यालयीन शिक्षकांच्या क्रीडास्पर्धा 2019 “टीचर्स लीग’ या स्पर्धेच्या उद्‌घाटन प्रसंगी केले.

सायली केरीपाळे म्हणाल्या, खेळामुळे आज मला मान-सन्मान मिळत आहे. भारतीय टीमसाठी खेळतांना मला जो आनंद झाला तो मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. कबड्डीच्या बारा बाय आठच्या मैदानात मी जगायला शिकले. त्यासाठी शिक्षकांची व आई- वडिलांनी खूप मोठी भूमिका आहे.

एकाच वर्षी भारताकडून खेळणे व छत्रपती पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य समजते. जीवनात अनेक खेळ स्पर्धा पाहिल्या व ऐकल्या. परंतु शिक्षकांसाठी टीचर्स लीग नावाने स्पर्धा होत आहेत हे
अभिमानास्पद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)