टेनिस स्पर्धा : अर्जुन, श्रावणी, सार्थ, कौशिकी यांना विजेतेपद

पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धा

पुणे – 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात अर्जुन किर्तने व श्रावणी देशमुख यांनी व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात सार्थ बनसोडे व कौशिकी समंथा यांनी येथे पार पडलेल्या पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने तर्फे 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ लॉन टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात तिस-या मानांकीत अर्जुन किर्तनेने पृथ्विराज हिरेमथचा 4-1,4-1 असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. अर्जून बिशप्स स्कुल, कॉम्प येथ सहावी इयत्तेत शिकत असून केदार शाहा यांच्या मार्गदर्शनाखाली बाऊंस टेनिस अकादमी येथे सराव करतो. या वर्षातील त्याचे हे पहिले विजेतेपद आहे.

12 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकीत श्रावणी देशमुखने आठव्या मानांकीत रितिका मोरेचा 4-1,4-0 असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. श्रावणी सिंहगड स्प्रिंगडेल स्कुल येथे आठवी इयत्तेत शिकत असून धरणीधर मिश्रा व राजेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र मंडळ येथे सराव करते. या वर्षातील तीचे हे तिसरे विजेतेपद आहे.
14 वर्षाखालील मुलांच्या गटात चौथ्या मानांकीत सार्थ बनसोडेने दुस-या मानांकीत आदित्य राय याचा 4-1,4-2 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. सार्थ माउंट सेंट पॅट्रीक स्कुल येथे नववी इयत्तेत शिकत असून मदन गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन जिमखाना येथे सराव करतो. त्याचे या वर्षातील हे पहिले विजेतेपद आहे.

14 वर्षाखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकीत कौशिकी समंथाने सहाव्या मानांकीत अलिना शेखचा संघर्षपुर्ण लढतीत 4-1,1-4,5-4(7-5) असा टायब्रेक मध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. कौशिकी आर्मी पब्लिक स्कुल येथे आठवी इयत्तेत शिकत असून हेमंत बेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पीवायसी हिंदू जिमखाना येथे सराव करते. तीचे हे या वर्षातील पहिले विजेतेपद आहे.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पोलिस इस्पेक्‍टर अशोक कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक धरणीधर मिश्रा यादी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल:

12 वर्षाखालील मुले : अंतिम फेरी- अर्जुन किर्तने(3) वि.वि पृथ्विराज हिरेमथ 4-1,4-1

12 वर्षाखालील मुली : अंतिम फेरी- श्रावणी देशमुख वि.वि रितिका मोरे(8) 4-1,4-0

14 वर्षाखालील मुले: अंतिम फेरी- सार्थ बनसोडे(4) वि.वि आदित्य राय(2) 4-1,4-2

14 वर्षाखालील मुली : अंतिम फेरी- कौशिकी समंथा(1) वि.वि अलिना शेख(6) 4-1,1-4,5-4(7-5)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)