राधिका, रुमा, शिवम, सॉम उपांत्यपुर्व फेरीत

पाचगणी -रवाईन हॉटेलतर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरीज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या राधिका महाजन, रुमा गायकैवारी, सई भोयार, तर मुलांच्या गटात शिवम कदम याने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

16 वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या राधिका महाजनने महाराष्ट्राच्याच सोनल पाटीलचा 4-6, 6-3, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सई भोयारने हर्षीता बांगेराचा 6-3, 4-6, 6-2 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या रुमा गायकैवारीने पश्‍चिम बंगालच्या मेखला मन्नाचा 6-7 (4), 6-1, 6-4 असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या शिवम कदमने गुजरातच्या धन्या शहाचा 6-1, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या सॉम चावलाने आसामच्या क्रितांता सर्माचा 6-3, 3-6, 6-2 तर गुजरातच्या अर्जुन कुंडूने आंध्र प्रदेशच्या अनंत मुनीचा 6-1, 4-6, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सविस्तर निकाल

उपउपांत्यपूर्व फेरी (16 वर्षांखालील मुली) ः राधिका महाजन (महाराष्ट्र) वि.वि सोनल पाटील (महाराष्ट्र) 4-6, 6-3, 6-2. सई भोयार (महाराष्ट्र) वि.वि. हर्षीता बांगेरा (महाराष्ट्र) 6-3, 4-6, 6-2. रुमा गायकैवारी (महाराष्ट्र) वि.वि. मेखला मन्ना (पश्‍चिम बंगाल) 6-7(4),6-1, 6-4.अमिशी शुक्‍ला (मध्यप्रदेश) वि.वि. सुर्यांशी तन्वर (हरियाणा) 7-5, 6-2.

अभया वेमुरी (तेलंगणा) वि.वि. ईशीता जाधव (महाराष्ट्र) 6-4, 6-2. अपुर्वा वेमुरी (तेलंगणा) वि.वि. दिया भारव्दाज (गुजरात) 6-3, 6-3. परी सिंग (हरियाणा) वि.वि. सुहिता मरुरी (कर्नाटक) 6-2, 2-6, 6-0. लक्ष्मी अरूणकुमार (तमिळनाडू) वि.वि. नागा रोशने (तमिळनाडू) 6-3, 6-3. उप-उपांत्यपूर्व फेरी (16 वर्षांखालील मुले) ः अर्जुन कुंडू(गुजरात) वि.वि अनंत मुनी(आंध्र प्रदेश) 6-1, 4-6, 6-1. निथलियन इरिक (कर्नाटक) वि.वि करीम खान(महाराष्ट्र) 6-1, 6-2.

अर्जुन प्रेमकुमार(कर्नाटक) वि.वि दिप मुनिम (मध्य प्रदेश) 6-3, 6-2. शिवम कदम(महाराष्ट्र) वि.वि धन्या शहा(गुजरात) 6-1, 6-3. सॉम चावला(दिल्ली) वि.वि क्रितांता सर्मा(आसाम) 6-3, 3-6, 6-2. रोनित लोटलीकर(कर्नाटक) वि.वि कार्तिक सक्‍सेना(दिल्ली) 6-2, 6-3. अजय सिंग(छत्तीसगड) वि.वि यशराज दळवी(महाराष्ट्र) 6-1, 6-3. आयुष भट(कर्नाटक) वि.वि अनर्घ गांगुली(महाराष्ट्र) 6-4, 6-4.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)