सेंट मेरी मुलींच्या संघाचा मोठा विजय

पुणे – झोया परीवानी हॅटट्रिक आणि नित्या भोसले दोन गोल यांच्या कौशल्यपूर्ण खेळामुळे सेंट मेरी स्कूलने अँग्लो उर्दू स्कूलचा प्रा. एन. डी. नगरवाला फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात 6-0 असा पराभव केला. हा सामना नागरवाला बोर्डींग स्कूलच्या मैदानावर पार पडला.

या सामन्यात सुरुवातीपासूनच सेंट मेरी संघाचा दबदबा राहिला. पाचव्याच मिनिटाला नित्या भोसले हिने पहिला गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तिनेच संघाचा दुसरा गोल नोंदवला. त्यानंतर सामन्यात थोडा सावध खेळ झाला.

18 व्या मिनिटला अंशुला राबडीयाने गोल करत आघाडी 3-0 अशी केली. याच मिनिटात झोयाने संघाचा चौथा तर स्वतःचा पहिला करत अगदी वाढवली. त्यांतर आणखी दोन करत तिने स्वतःची हॅटट्रीक पूर्णकेले आणि संघाला 6-0 असा विजय मिळवून दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)