केसरी करंडक फुटबॉल : एन. वाय. एफ. ए, परशुरामियन्सची विजयाने सुरुवात

पुणे – एन.वाय.एफ.ए, परशूरामियन्स, व्हॅलीहंटर, डेक्कन 11 अ संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेचा उद्‌घाटनाचा दिवस गाजवला.

पहिल्या दिवशी झालेल्या फुटबॉल सामन्यांमध्ये पहिला सामना एन. वाय. एफ. ए संघ आणि रिअल पुणे युनायटेड संघात झाला. हा सामना एन. वाय. एफ. ए फुटबॉल संघाने 2-1 असा जिंकला. या सामन्यात एन. वाय. एफ. ए फुटबॉल संघाचा तेजस चिल्लाळ याने सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर त्याला उत्तर देताना रिअल पुणे युनायटेड संघाचा जो. एल. किरवळे याने 40 मिनिटाला गोल करत 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर एन. वाय. एफ. ए फुटबॉल संघाच्या हर्ष शहा याने 50 मिनिटाला गोल करत हा सामना 2-1 असा एन. वाय. एफ. ए फुटबॉल संघाच्या नावावर केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतरचा दुसरा सामना परशुरामियन्स ब संघ आणि फ्रेंड्‌स 11 संघात रंगला. हा सामना परशुरामियन्स ब संघाने 2-0 असा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. या सामन्यात परशुरामियन्स ब संघाचा सारंग दातार याने सामन्याच्या 12 मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर परशुरामियन्स ब संघाच्या सौरभ वैद्य याने 22 मिनिटाला दुसरा गोल करत सामन्याला मजबूत आघाडी मिळवून दिली. फ्रेंड्‌स 11 संघाच्या अथर्व देशपांडे आणि सोहम मारणे यांनी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी चुरशीचा लढा दिला मात्र त्यांना एकही गोल करता आला नाही.

तिसरा सामना व्हॅलीहंटर आणि जायंट्‌स ब संघात झाला. हा सामना व्हॅलीहंटर संघाने 1-0 असा जिंकला. या सामन्यात व्हॅलीहंटर संघाच्या दिमांशू कनोजीन याने 40 मिनिटाला निर्णायक गोल करत हा सामना जिंकला. या सामन्यात जायंट्‌स ब संघाचे रोहित सावंत, शोएब शेख असे नामवंत खेळाडू सपशेल अपयशी ठरले. पहिल्या दिवसाचा अखेरचा सामना डेक्कन 11 अ संघ आणि नॉयझी बॉइज संघात झाला. या सामन्यात डेक्कन 11 अ संघाने 9-0 असे आपले वर्चस्व दाखवून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)