अरुण सावंत ‘पुणे श्री 2019 चा’ मानकरी

पुणे -पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने आणि द हिंदू फाऊंडेशन आणि धनंजय विष्णू जाधव मित्र परिवार यांच्यातर्फे आयोजित स्पर्धेत अरुण सावंतने “पुणे श्री 2019’चा किताब पटकाविला तर शैलेंद्र शुक्‍ला हा “ना. गिरीश बापट श्री 2019′ चा आणि योगेश जाधव हा “द हिंदू फाऊंडेशन श्री 2019 चा’ मानकरी ठरला.

ही स्पर्धा लोकमान्य नगर जॉगिंग पार्क येथे पार पडली. या स्पर्धेत एकूण 177 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. 55 किलो वजनीगटात नवनाथ गावडेने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक सोमनाथ पाल तर तृतीय क्रमांक शुभम खरातने पटकाविला. 60 किलो वजनी गटात रोनी एम ने विजेतेपद मिळवले. 65 किलो वजनी गटात ओंकार परदेशी आणि 70 किलो वजनीगटात राजेश काळेने विजेतेपद पटकाविले. 75 किलो वजनीगटात अरुण सावंतने बाजी मारत किताब पटकाविला. 80 किलो वजनीगटात आसिफ अहमदचे वर्चस्व राहिले तर 85 किलो वजनीगटात शैलेंद्र शुक्‍ला विजेता ठरला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)