एचएसबीसी संघाने पटकावले विजेतेपद

पुणे – एचएसबीसी संघाने बार्कलेज ए संघाचा 3-1 असा पराभव करत शारदा स्पोर्टस सेंटरने आयोजित केलेल्या आंतर कार्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. एचएसबीसीच्या विजयात सुयोग पाटील यांनी चमकदार कामगिरी केली.

अंतिम फेरीतील पहिल्या एकेरीच्या सामन्यात सुयोग पाटील यांनी बार्कलेज ए संघाच्या अयाझचा 11-7, 11-7 आणि 11-5 असा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात बार्कलेज ए च्या अमितने एचएसबीसीच्या अशोक शोभपंडितला 6-11, 7-11, 11-8 आणि 9-11 असे नमवत अंतिम फेरीत बरोबरी साधून दिली. दुहेरीच्या सामन्यात एचएसबीसीच्या सुयोग पाटील आणि साई बाकरे यांच्या जोडीने बार्कलेज ए च्या अमित आणि अयाझच्या जोडीचा 13-11, 11-7 आणि 11-5 असा पराभव करत 2-1 अशी आघाडी घेतली. अखेरच्या एकेरीच्या सामन्यात सुयोग पाटील यांनी अयाझचा पुन्हा 8-11, 11-6, 11-6 आणि 11-6 असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तत्पूर्वी, उपांत्यफेरीच्या सामन्यांत बार्कलेज ए संघाने इन्फोसिस संघाचा 3-1 असे नमवत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते तर एचएसबीसी संघाने डीआरडीओ संघाला 3-1 असे हरवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.बार्कलेज ए आणि इन्फिोसिस यांच्यातील पहिल्या एकेरीच्या सामन्यात इन्फोसिसच्या अमित गांवकरने बार्कलेज ए संघाच्या अयाझला एकतर्फी लढतीत 2-11, 5-11 आणि 4-11 असे पराभूत करत खळबळजनक निकाल नोंदवला होता; परंतु पुढील तीन सामने गमावल्याने इन्फोसिस 3-1 असे पराभूत होत स्पर्धेबाहेर फेकले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)