क्‍यू क्‍लब मानांकन खुली स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धा : मुकुंद भराडीया याला विजेतेपद

पुणे – द क्‍यू क्‍लब तर्फे आयोजित क्‍यु क्‍लब खुल्या स्नुकर अजिंक्‍यपद’ स्पर्धेत मुकुंद भराडीया याने राष्ट्रीय स्नुकरपटू शिवम अरोरा याचा 5-0 असा एकतर्फी पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मुकूंद भराडीया याने शिवम अरोरा याचा 5-0 असा एकतर्फी पराभव करून स्पर्धेत विजेतेपद मिळवले. फॉर्ममध्ये असणाऱ्या मुकुंद याने अंतिम सामन्यात शिवम याला प्रतिकाराची संधी दिली नाही. पहिल्या तीन 48-12, 46-29, 55-10 अशा जिंकून 3-0 अशी आघाडी घेतली. चौथ्या फ्रेममध्ये मुकूंदने 70 गुणांचा ब्रेक नोंदवित 4-0 अशी आघाडी घेतली. पाचवी फ्रेमही 8 गुणांच्या फरकाने 39-31 अशी जिंकून स्पर्धेत विजेतेपद मिळवले.

तत्पूर्वी, स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पुण्याच्या मुकूंद भराडीया याने शाबाझ खान याचा 3-1 असा पराभव केला. मुकूंद याने पहिली फ्रेम 43-22 अशी तर, दुसरी फ्रेम 48-17 अशी जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली. शाबाझ याने लढतीमध्ये प्रतिउत्तर देताना 55-16 अशी फ्रेम जिंकत आघाडी 1-2 अशी कमी केली. मुकूंद याने चौथी फ्रेम 38-31 अशी 7 गुणांनी जिंकून अंतिम फेरीत धडक मारली.

राष्ट्रीय स्नुकरपटू शिवम अरोरा याने पुण्यातील योगेश शर्मा याचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. अत्यंत चुरशीच्या आणि अडीच तास चाललेल्या या सामन्यात शिवमने पहिले दोन फ्रेम 38-31, 45-22 असे जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली. योगेशने सामना एकतर्फी होणार नाही याची काळजी घेत पुढील दोन फ्रेम 55-20, 56-11 असे जिंकून सामन्यात 2-2 अशी बरोबरी निर्माण केली. अंतिम आणि निर्णायक फ्रेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येक गुणांसाठी चुरस झाली. पण शिवमने केवळ दोन गुणांच्या फरकाने 36-34 अशी फ्रेम जिंकून अंतिम फेरी गाठली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)