मुंबई विद्यापीठ विजेता तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपविजेता

पश्‍चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (मुली) स्पर्धा

लातूर  – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत पश्‍चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (मुली) स्पर्धेत मुंबई विद्यापीठ मुंबई संघाने विजेतेपद तर सावित्रीबाई फुले संघाने उपविजेते पद पटकाविले.

मुंबई विद्यापीठाच्या सायली जाधवला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा तर सोनाली हेळवी हिला सर्वोत्कृष्ट चढाई पटू आरती बोडके हिला सर्वोत्कृष्ट पकडीसाठी विशेष पुरस्कारा देण्यात आले. तृतीय स्थानी एस एन डी टी विद्यापीठ तर चतुर्थ स्थानी भारती विद्यापीठ, पुणे हे संघ राहीला. हे चारही संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या वतीने माजी कबड्डीपटू कै. सतीशसिंह हजारी यांच्या स्मरणार्थ प्रथम आलेल्या संघास रु. 11000/- व द्वितीय आलेल्या संघास रु. 5000/- रोख व स्मृतीचिन्ह हे विशेष पारितोषिक देण्यात आले.

अंतिम सत्रात झालेल्या अटी-तटीच्या झालेल्या सामन्यात एस एन डी टी विद्यापीठ मुंबईने सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे संघांवर 26-23 अशी मात केली. यावेळी तृप्ती लांडगे, तेजल पाटील, सोनाली हेळवे, दिक्षा झोरी यांनी चमकदार कामगिरी केली. यात तेजल पाटील हीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)