खेलो इंडिया स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

750 स्वयंसेवकांची यशस्वितेसाठी फळी; 9 ते 20 जानेवारीदरम्यान स्पर्धा

पुणे – क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले किंवा त्या क्षेत्राविषयी आपुलकी असणारे स्वयंसेवक हेच खेलो इंडिया स्पर्धेच्या यशस्वितेचा मुख्य चेहरा असणार आहे. शिवछत्रपती क्रीडानगरीत 9 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्याकरिता 750 स्वयंसेवकांची फळी उभारण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या स्पर्धेच्या संयोजनात अनेक युवा हौशी खेळाडूंनी, क्रीडाशिक्षकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्राबरोबरच परराज्यांमधील शालेय व महाविद्यालयात क्रीडा शिक्षक किंवा प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्यांचा त्यामध्ये मोठावाटा आहे.

गेले दोन दिवस येथील क्रीडानगरीत या स्वयंसेवकांकरिता उद्‌बोधक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. स्वयंसेवकांची निवड करताना कोणत्याही खेळाचा अनुभव हा प्रमुख निकष ठेवण्यात आला होता. व्यवस्थापन अभ्यासक्रमाची पदवी, पदविकासंपादन केलेल्यांनाही

स्वयंसेवक म्हणून संधी देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहा हजार खेळाडू, 1800 तांत्रिक अधिकारी, दहा हजारहून अधिक खेळाडू, 750 स्वयंसेवक, एक हजार अन्य संघटक असे दहा हजार जण सहभागी होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)