उंच उडीत महाराष्ट्राच्या धैर्यशीलला रौप्यपदक

पुणे – उंच उडीत धैर्यशील गायकवाड याने 17 वर्षाखालील गटात उंच उडीत रौप्यपदक पटकाविले. धैर्यशील व पंजाबचा रॉबिनदीप सिंग यांनी प्रत्येकी 1.98 मीटर्सपर्यंत उडी मारली. तथापि रॉबिन याने कमी प्रयत्नात हे अंतर पार केल्यामुळे त्याला सुवर्णपदक मिळाले.

धैर्यशील याला दुस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याचा सहकारी दत्ता याने 1.92 मीटर्सपर्यंत उडी मारली व तिसरे स्थान घेतले. मुलांच्या 21 वषार्खालील गटात नायर याने 14.98 मीटर्सपर्यंत गोळाफेक केली व तिसरा क्रमांक घेतला. दिल्लीचा साहिबसिंग (18.18 मीटर्स) व उत्तरप्रदेशचा सत्यम चौधरी (16.54 मीटर्स) हे अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाचे मानकरी ठरले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)