खेलो इंडिया युथ गेम्स : ‘खो-खो’मध्ये महाराष्ट्राची शानदार सलामी

पुणे – अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राने मुलांच्या 17 व 21 वषार्खालील गटात दणदणीत विजय मिळवित खो खो मध्ये झोकात सलामी केली. महाराष्ट्राने 17 वर्षाखालील मुलांच्या एकतर्फी लढतीत गुजरातला 11-9 असे दोन गुण व साडेसात मिनिटे राखून पराभव केला. त्याचे श्रेय दिलीप खांडवी (2 मि.10 सेकंद व 1 मिनिट 40 सेकंद), रोहन कोरे (2 मि, 2 मि.20 सेकंद तसेच तीन गडी), अभिषेक शिंदे (नाबाद दीड मिनिटे व एक मिनिट 40 सेकंद) यांना द्यावे लागेल. गुजरातकडून किस्मत दाबी याने चार गडी बाद करीत एकाकी लढत दिली.

तामिळनाडू संघाने मणिूपर संघाचा 14-11 असा एक डाव 3 गुणांनी पराभव केला. त्यामध्ये एम.गोपालकृष्ण (2 मि.50 सेकंद, 1 मि.40 सेकंद व 5 गडी), टी. गौतम (नाबाद अडीच मिनिटे, दीड मिनिटे व चार गडी) यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. मणिपूरकडून एम.मनीषसिंग याने दोन मिनिट पळती व दोन गडी अशी कामगिरी करीत चांगली झुंज दिली.
मुलांच्या 21 वषार्खालील गटात महाराष्ट्राने छत्तीसगढ संघाचा 20-12 असा एक डाव 8 गुणांनी धुव्वा उडविला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्राकडून अवधूत पाटील (1 मि.10 सेकंद व 1 मि.40 सेकंद, तसेच चार गडी), मिलिंद कुरपे (2 मिनिटे व चार गडी), अरुण गुणके (2 मि.20 सेकंद व तीन गडी) यांनी अष्टपैलू कामगिरी केली. छत्तीसगढ संघाकडून नितीनकुमार व किशोरकुमार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

मुलींच्या 17 वषार्खालील गटात पंजाबने पश्‍चिम बंगाल संघावर 11-7 असा अनपेक्षित विजय नोंदविला. त्यांच्या हरमानप्रित कौर (4 मिनिटे व 2 मिनिटे, तसेच एक गडी), अमरीत कौर (3 मिनिटे)व रमणदीप कौर (पाच गडी) यांनी कौतुकास्पद वाटा उचलला. बंगाल संघाच्या इशिता बिस्वास (दीड मिनिटे, अडीच मिनिटे व तीन गडी) व तृष्णा बिस्वास (2 मि.40 सेकंद) यांनी दिलेली लढत निष्फळ ठरली. खो खो च्या सामन्यांना रविवारपासून प्रारंभ झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)