ज्युदोत महाराष्ट्राचा दुहेरी धमाका; अपूर्वा व देवतिलक यांना सुवर्ण

पुणे -महाराष्ट्राच्या अपूर्वा पाटील व देवतिलक थापा यांनी ज्युदोत सुवर्णपदक मिळवित संघासाठी दुहेरी धमाका केला. अपूर्वा हिने 17 वषार्खालील गटाच्या 63 किलो विभागात सुवर्णपदक जिंकले. तिने अंतिम फेरीत दिल्लीच्या ज्योती टोकस हिच्यावर सनसनाटी विजय मिळविला.

अपूर्वा ही ठाण्याची खेळाडू असून तिने यापूर्वी राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगले यश मिळविले आहे. 58 किलो गटात मात्र महाराष्ट्राच्या गौतमी कांचन हिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिला अंतिम फेरीत दिल्लीच्या प्रेरणा टोकस हिने पराभूत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गौतमी ही पुण्यातील सोलारीस क्‍लबमध्ये सराव करीत असून रचना धोपेश्‍वर यांच्या मार्गदर्शानाखाली खेळत आहे. मुलांच्या 17 वषार्खालील गटात देवतिलक याने मणिपूरच्या थोंगजम अबुगम याच्यावर खळबळजनक विजय नोंदविला. त्याने ज्युदोचे सर्वोत्तम कौशल्य दाखवित हे विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राच्या आदित्य धोपावकर याने 81 किलो गटात ब्रॉंझपदकाची कमाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)