शालेय विद्यार्थ्यांनी क्रीडानगरी गजबजली

विद्यार्थ्यांसह पोलिसही सहभागी

ऍथलेटिक्‍स स्टेडियममागे उभारण्यात आलेल्या क्रीडा प्रदर्शनासही शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट देत आहेत. तेथे टेबल टेनिस, टेनिस, ऍथलेटिक्‍स, फुटबॉल आदी खेळांची कृत्रिम छोटी मैदाने उभारण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे रोप क्‍लाईम्बिंगच्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधांचाही शालेय विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. विशेषत: ऍथलेटिक्‍सच्या ट्रॅकवर धाव घेण्याचा आनंद घेण्यात अनेक बालचमू रमत आहेत. त्याचबरोबर बंदोबस्तासाठी असलेले पोलिसही विद्यार्थ्यांना एक्‍स्पोमधून आणून स्वत: देखील सहभागी होत आहेत.

पुणे – शालेय मुलामुलींनी क्रीडानगरीस भेट देऊन विविध क्रीडा स्पर्धांचा अनुभव घ्यावा व खेळाडूंबरोबर संवाद साधावेत, हा खेलो इंडिया महोत्सवामागील हेतू सफल झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांची भेटींमुळे शिवछत्रपती क्रीडानगरी गजबजली आहे. केवळ पुणे व पिंपरी चिंचवड शहर नव्हे तर बारामती, खेड, जुन्नर, इंदापूर आदी अनेक तालुक्‍यांमधील काही शाळांनी खेलो इंडिया पाहण्याच्या सहलींचे आयोजन केले आहे.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे म्हाळुंगे बालेवाडीतील क्रीडानगरीत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. खेलो इंडियातील सामने दिवसभर सुरु असतात. त्यामुळे येथे भेट देणा-या शालेय विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या तरी खेळांचे सामने पाहण्याची संधी मिळत आहे. या विद्यार्थ्यांना विविध सामन्यांबाबत अद्यावत माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारण्यात आली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंतरराष्ट्रीय खेळाडूंची ठिकठिकाणी पोस्टर्स

स्टेडियम्समध्ये ठिकठिकाणी सुशीलकुमार, मेरी कोम, सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू आदी अनेक ऑलिंपिक पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची पोस्टर्स उभारण्यात आली आहेत. या पोस्टर्सजवळ उभे राहून छायाचित्रे काढण्यासाठीही विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता दिसून येत आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी राज्य क्रीडा खात्यातर्फे माहितीपटही दाखविण्यात आहे. हा माहितीपट पाहण्यासाठीही या विद्यार्थ्यांमध्ये उत्कंठा दिसून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)