पराभवानंतर ट्विट केल्यानंतर ‘या’ कारणामुळे के.एल. राहुल झाला ट्रोल

साऊथहॅम्पटन – भारतीय संघाचा युवा फलंदाज के.एल. राहुल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो नेहमी आपले स्टेटस अपडेट करत असतो. इंग्लंडच्या विरूध्द चौथ्या कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर राहुलने ट्विट करत आपला सहकारी , वेगवान गोलदांज ईशांत शर्मा याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र पराभवानंतर लगेच त्याच हे ट्विट आल्याच क्रिकेटचाहत्यांना आवडले नाही, त्यानंतर या ट्विटसाठी चाहत्यांनी त्याला चांगलेच सुनावले.

दरम्यान इंग्लंडविरूध्द कसोटी मालिकेत भारतीय संघ 3-1 ने मालिका गमावून बसला आहे. तिसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय प्रेक्षकांना आशा होती की चौथा सामनादेखील भारत जिंकेल, मात्र फलदांजाच्या खराब कामगिरीमुळे भारताला सामना गमवावा लागला. ईशांत शर्माच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त राहुलने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी म्हटले होते की, भारतीय संघात ईशांतसारख्या  विनम्र, खऱ्या आणि शानदार अशा वरिष्ठाची गरज असते.ईशांत तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मात्र भारतीय संघाच्या पराभवामुळे निराश झालेल्या चाहत्यांना हे  ट्विट करण्याची वेळ आवडली नाही. त्यांनी राहुलला ट्रोल करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. एका चाहत्यांने लिहिले, ‘हार्दिक पांड्याची काॅपी आहे, थोडी लाज बाळग’. एकाने ट्विट केले की, ‘तुमच्यापेक्षा अाश्विन बरा आहे, जो कमीत कमी दोन अंकी धावा तरी करतो’.

दरम्यान राहुलने इंग्लंड विरूध्द चौथ्या सामन्यात पहिल्या डावात 19 धावा आणि दुसऱ्या डावात शून्य धावा केल्या होत्या. मालिकेत राहुलने आतापर्यत 4,13,8,10,23 आणि 36 अशा धावा केल्या आहेत. राहुलला भारताचा उद्योमुख युवा खेळाडू मानले जाते मात्र या मालिकेत तो या मालिकेत चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे भारतीय चाहते त्याच्यांवर नाराज झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)