युवराजने षटकार खेचल्यावर मला स्टुअर्ट ब्रॉड झाल्यासारखे वाटले-चहल

बंगळुरू  -रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, युवराज सिंगने माझ्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर षटकार खेचल्यावर मला स्टुअर्ट ब्रॉड झाल्यासारखे वाटले.

रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात युवराजने 14 व्या षटकांत युझवेंद्र चहलच्या पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार खेचले आणि चौथ्या चेंडूवर तो सीमारेषेजवळ झेलबाद झाला. याबाबत बोलताना चहलने 19 सप्टेंबर 2007 रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड विश्‍वचषक टी- 20 सामन्यांची आठवण करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)