IND vs WI 2nd Test : ‘मयांक अग्रवाल’ला पदार्पणासाठी आणखी वाट पहावी लागणार

दुसऱ्या कसोटीसाठी 12 सदस्यांच्या संघात मयांकचा समावेश नाही

नवी दिल्ली – घरगुती क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मयांक अग्रवाल याचे डिसेंबरमध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी आंतरराष्ट्रीय अनुभव मिळविण्याचा आणि पहिला कसोटी सामना खेळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. सर्व क्रिकेट जाणकार आशा लावून होते की, दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मयांक अग्रवाल याला के एल राहुल एेवजी संघात स्थान मिळेल.

-Ads-

राहुल हा पहिल्या सामन्यात शून्यावरच बाद झाला होता. तरीपण संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, त्यांचा के एल राहुलवर जास्त विश्वास आहे. याच कारणामुळे वेस्टइंडिजविरूध्द शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पहिल्या कसोटी सामन्यातीलच 12 सदस्यांचा संघ कायम ठेवण्यात आला आहे.

भारताने सामना सुरू होण्याच्या 24 तासाआधीच 12 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. याचांच अर्थ की मयांक अग्रवाल याला दुसऱ्या कसोटीमध्ये आराम करावा लागणार आहे. वेगवान गोलदांज शार्दुल ठाकूर याचा 12 सदस्यांच्या संघात समावेश करण्यात आला आहे पण त्यालाही फायनला 11 मध्ये जागा मिळणे कठीण आहे.

भारतीय 12 सदस्यांचा संघ – विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रविंद्र अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि शार्दुल ठाकुर (12 वा खेळाडू)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)