file photo

कोलंबो – स्मृती मानधना हिची नाबाद 73 धावांची खेळी आणि मानसी जोशी हिने 16 धावा देत घेतलेले 3 बळी या कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने विजय साकारला आहे. भारतीय महिला संघाने आयसीसी महिला चॅम्पियनशिप क्रिकेटच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर नऊ विकेट राखून विजय मिळवला आहे.

तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंका महिला संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा महिला संघाला 98 धावाच उभारत्या आल्या. विजयासाठी 99 धावांच असलेले लक्ष्य भारताने एक विकेट गमावत पूर्ण केले.

मालिकेतील भारत आणि श्रीलंका याच्यां दरम्यानचा दूसरा सामना आता 13 सप्टेंबरला खेळला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)