लंडन – भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी उपहारापर्यंत इंग्लडच्या 2 बाद 243 धावा झालेल्या आहेत. इंग्लंडकडे सध्या 283 धावांची आघाडी झाली आहे.

उपहारासाठी खेळ थांबला तेव्हा  एलिस्टर कुक नाबाद 103 आणि कर्णधार जो रूट 92 धावांवर खेळत होता. शेवटची कसोटी खेळत असलेल्या एलिस्टर कुकचे हे 33 वे शतक ठरले. इंग्लंडचे दुसऱ्या डावात कीटन जेनिंग्स आणि मोईन अली हे फलंदाज बाद झाले आहेत.

याआधी  तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडकडे 40 धावांची आघाडी होती. काल भारत सर्वबाद 292 अशा धाव संख्येपर्यंत मजल मारू शकला होता. यामध्ये रवींद्र जडेजा याने नाबाद 86 धावा करत भारताची लाज राखली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)