#IND_Vs_AUS 2nd T20 : भारताची बरोबरीची संधी हुकली

दुसऱ्या टी -20 सामन्यावर पावसाने पानी फेरले

मेलबर्न – भारत वि. ऑस्ट्रेलिया याच्यांतील तीन टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने पहिली लढत जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली होती. आजच्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला मालिकेत बरोबरी करण्याची संधी होती. मात्र, ती पावसामुळे हुकली. त्यामुळे आता रविवारी (25 नोव्हेंबर) होणाऱ्या अखेरच्या लढतीत भारताला विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी करुन मालिका वाचविण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.

यावेळी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 19 षटकांत 7 बाद 132 धावा केल्या होत्या. त्यावेळी पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. त्यामुळे भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार 19 षटकांत 137 धावांचे आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पाऊस आल्याने भारतापुढे 11 षटकांत 90 धावांचे आव्हान देण्यात आले. पण पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोहलीचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरोन फिंच शून्यावर झेलबाद झाला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर फिंच ऋषभ पंतकडे झेल देऊन परतला. त्यामुळे पहिल्याच षटकांत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लागला.

यानंतर लगेचच दुसरा सलामीवीर शॉर्टच्या बॅटची कडा घेऊन चेंडू विकेटकिपर पंतकडे गेला. पण, पंतने झेल सोडला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सावध खेळ करायला सुरुवात केली. मात्र, फटकेबाजीला सुरुवात केल्यानंतर धोकादायक ख्रिस लिनदेखील 13 धावांवर झेलबाद झाला. पाठोपाठ चांगली सुरुवात मिळालेला सलामीवीर डार्सी शॉर्ट खलीलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 14 धावांची खेळी केली.

तर, पहिल्या सामन्यात मॅक्‍सवेलच्या साथीत चांगली फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांवर राज्य गाजवलेल्या मार्कस स्टॉयनीसला या सामन्यात चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले आणि तो केवळ 4 धावा करुन बाद झाला. ग्लेन मॅक्‍सवेलही या सामन्यात आपली चमक दाखवू शकला नाही आणि 22 चेंडूत 19 धावा करून तो स्वस्तात बाद झाला. त्याने आजच्या डावात केवळ 1 चौकार लगावला. देशांतर्गत टी20 स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा यष्टीरक्षक ऍलेक्‍स कॅरी देखिल 4 धावाच करता आल्या.

ठराविक अंतराने बळी पडत असताना उतरलेल्या नॅथन कुल्टर-नाईल याने 9 चेंडूत 18 धावांची वेगवान खेळी करत ऑस्ट्रेलियाची धावगती थोडी वाढवली. मात्र, त्याच्या रुपाने ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी माघारी परतला. त्याला भुवनेश्वर कुमारने माघारी पाठवले.

यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला तेंव्हा बेन मॅक्‍ड्रेमोट 32 आणि अँड्रयू टाय 12 धावांवर खेळत होते. पावसाच्या व्यत्ययामुळे त्यापुढे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे भारताच्या हातून मालिका बरोबरीची संधी हुकली. यावेळी भारता कडून भुवनेश्‍वर कुमार आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर, बुमराह, पांड्या आणि कुलदीपयांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया 19 षटकांत 7 बाद 132 (बेन मॅक्‍ड्रेमोट नाबाद 32, अँड्रयू टाय नाबाद 12, ग्लेन मॅक्‍सवेल 19, नॅथन कुल्टर-नाईल 18, भुवनेश्‍वर कुमार 20-2, खलील अहमद 39-2).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)