#हाॅकी_विश्वचषक_स्पर्धा_2018 : अर्जेंटिनाचा स्पेनवर विजय

भुवनेश्वर – अॅगस्टिन माजिले आणि गोंजालो पेलाट यांच्या गोलाच्या जोरावर अर्जेंटिनाने ओडिशा हाॅकी विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिना संघाने गुरूवारी ग्रुप ए च्या पहिल्या सामन्यात विजयी सुरूवात केली. कलिंगा स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात अर्जेंटिना संघाने स्पेनवर 4-3 अशी मात केली.

एनरिक गोंजालेजने तिसऱ्या मिनिटाला स्पेनसाठी गोल करत संघाचे खाते उघडले. मात्र पुढच्याच मिनिटात आॅगस्टिन माजिले याने गोल करत अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली. पहिल्या सत्रात सामन्याचा स्कोर 3-2 असा होता.

दुसऱ्या सत्रात स्पेनने चांगली सुरूवात करत विसेंक रूइजने 35व्या मिनिटाला गोल करत अर्जेंटिनाविरूध्द 3-3 ने बरोबरी साधली. त्यानंतर अर्जेंटिनाच्या गोंजालोने 49 मिनिटाला दुसरा गोल करत अर्जेंटिनाला स्पेनविरूध्द 4-3 ने आघाडी मिळवून दिली. अर्जेटिनाने ही आघाडी शेवटपर्यत कायम राखत स्पेनविरूध्द स्पर्धेतील पहिला विजय मिळविला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)