राष्ट्रीय ज्युनिअर हाॅकी स्पर्धेत पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी

दिल्ली आणि तामिळनाडू संघाचे पराभव

औरंगाबाद : अत्यावश्‍यक असलेला विजय साकारुन गत विजेता पंजाब संघाने राष्ट्रीय ज्युनिअर हाॅकी स्पर्धेत नॉकआऊटच्या फेरीत स्थान पटकावले आहे. मध्यप्रदेश हॉकी अकादमीच्या संघानेही विजय मिळवुन स्पर्धेतील आपले अस्त्वि कायम ठेवले. काल झालेल्या सामन्यात गंगपूर-ओडिशा आणि उत्तरप्रदेश संघाने प्रतिस्पर्धींना नमवुन उपउपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चंदिगड, हॉकी हरियाणा संघानेसुद्धा या स्पर्धेत आगेकूच केली. दिल्ली आणि तामिळनाडू संघांना शुक्रवारी मात्र निराशाच पदरी आली. गतवेळेस अजिंक्‍यपद पटकावणाऱ्या पंजाब संघाची खेळी यंदा काहीशी लडखडली. नॉकआऊटमध्ये जाण्यासाठी एका विजयाची गरज असताना पंजाबने हिमाचलला 6-0 ने दणदणीत मात देत आपली गुणसंख्या सात पर्यंत नेत बाद फेरीकडे आगेकूच केली. पंजाबकडुन सुदर्शन सिंग (8 मि., 41 मि.) प्रतिक शर्मा (15 मि.), जसप्रित सिंग (25 मि.), गुरपाल सिंग (26 मि.), विशालजित सिंग (44 मि.) यांनी गोल करुन संघासाठी निर्भेळ यश साकारले.

चंदिगड संघाने तामिळनाडू संघाला 4-1 ने मात देत 10 गुणांच्या साथीने नॉकआऊट मध्ये स्थान मिळवले. चंदिगडच्या विजयाने हॉकी पंजाबचा नॉकआऊटचा प्रवास सोपा झाला. या सामन्यातील सगळे पाच गोल मध्यांतरापुर्वीच झाले. चंडीगडच्या हाशिम (3 मि., 7 मि.) ने दोन गोल केले. त्याचा साथीदार मनिंदर सिंग (14 मि., 16 मि.) ने अजुन दोन गोल करत चंडीगडची आघाडी 4-0 अशी वाढवली. तामिळनाडूच्या एस. कार्थीने 20 व्या मिनीटांत पेनल्टी स्ट्रोकने ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला.

हरियाणाने मुंबई असोसिएशन संघाला 3-0 ने पराभवाचा धक्का दिला. सलग चौथा विजय साकारुन 12 गुणांसह ब गटात अव्वाल स्थान कायम राखले आहे. हरियाणाच्या अंकुशने 19 व्या मिनीटात संघाला आघाडी मिळवुन दिली. त्यावर सनी मलिकने 31 आणि 56 व्या मिनीटांत गोल करुन विजयची वाट प्रशस्त केली. मुंबई संघाला एकही गोल करता आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)