आशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारताच्या अभियानाला आजपासून सुरुवात

अबूधाबी – शनिवारपासून प्रारंभ होत असलेल्या प्रतिष्ठेच्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघ आपल्या अभियानाला आजपासून सुरुवात करणार असून भारताचा आज पहिला सामना थायलंड विरुद्ध होणार आहे. भारतीय संघ 2011 ची निराशाजनक कामगिरी मागे टाकून विजयासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्याचसोबत 2026 च्या विश्‍वकप
स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने भारत पहिले पाऊल टाकण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग करणार आहे.

आशियाई फुटबॉल महासंघातर्फे (एएफसी) आयोजित या स्पर्धेसाठी पात्रता मिळवणाऱ्या संघांची संख्या आता 16 वरून 24 झाली आहे. जायद स्पोर्टस्‌ सिटी स्टेडियममध्ये यजमान संयुक्‍त अरब अमिरात (यूएई) आणि बहरीन यांच्यादरम्यान “अ’ गटातील लढतीने शनिवारी स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताचा याच गटात समावेश असून त्यात यजमान संघाचा समावेश आहे. भारताची सलामी लढत रविवारी अल नाहयान स्टेडियममध्ये थायलंडसोबत होणार आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील अखेरचा सहभाग आठ वर्षांपूवी होता. त्यावेळी भारताला आशियातील पॉवर हाऊस ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया व बहरीन या संघांकडून मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघ चौथ्यांदा या स्पर्धेत सहभागी होत आहे. ही 17 वी स्पर्धा आहे.

भारतीय संघाने 2011 मध्ये 24 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली होती. 2015 मध्ये भारताला स्पर्धेसाठी पात्रता मिळवता आली नाही. त्यावेळी यजमान ऑस्ट्रेलिया संघ विजेता ठरला होता. भारतीय संघाला मालिकेत बहरीन, थायलंड व यूएई यांच्यासारख्या संघांकडून कडवे आव्हान मिळेल.

भारतीय संघ – गुरप्रीतसिंग संधू (गोलरक्षक), अमरिंदर सिंग ( राखिव गोलरक्षक), सुनील छेत्री (कर्णधार), प्रीतम कोटल, सार्थक गोलुई, संदेश झिंगन, अनास एडाथोडीका, सलाम रंजन सिंग, शुभाशिष बोस, नारायण दास, उदांता सिंह, रॉलीन बोर्जेस, अनिरुध थापा, विनीत राय, हालीचरण नर्झारी, आशिक कुरुनीयन, जर्मनप्रीत सिंह, जॅकीचंद सिंह, प्रोणय हलदर, जेजे लालपेखलुआ, सुमित पासी, बलवंत सिंह.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)