मुख्य फेरीसाठी महाराष्ट्राचा संघ पात्र
सोलापूर – संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत रविवारी चौथ्या दिवशी यजमान महाराष्ट्राने दुबळ्या दादरा नगर हवेलीचा दहा गोलनी पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश मिळविला. महाराष्ट्राच्या संकेत साळुंखेने चार गोल नोंदवून विजयाचा शिल्पकार ठरला.
संतोष ट्रॉफी राष्ट्रीय स्पर्धेच्या मुख्य फेरीला पात्र ठरण्यासाठी महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा सामना महत्त्वपूर्ण होता. अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राने चौफेर खेळ करून दुबळ्या दादरा नगर हवेलीवर वर्चस्व गाजवले. 18 व्या मिनिटाला महाराष्ट्राच्या मृणाल पांडेने मैदानी गोल करून धडाकेबाज सुरुवात केली.
भरवशाचा खेळाडू आरिफ शेखने 21 मिनिटाला गोल करून आघाडी 2-0 अशी केली. मध्यफळीतील संकेत साळुंखेने 24 व्या मिनिटाला मैदानी गोल करून 4 -0 असा गोलफरक केला. पुन्हा अरिफने आपला दुसरा तर संघाचा पाचवा गोल करून दादरा नगर हवेलीला सळो की पळो केले. संकेतने 39 आणि 45व्या मिनिटाला गोल करून आपली हॅट्ट्रिक साजरी केली.
उत्तरार्धात दादरा नगर हवेलीने बचावात्मक पवित्रा घेऊन महाराष्ट्राला प्रतिकार वाढविला. संकेत मे पुन्हा आपली जादू दाखवित आपला वैयक्तिक चौथा तर संघाचा आठवा गोल नोंदवून दणका दिला. पाठोपाठ 64 व्या मिनिटाला रोहन शुक्लाने नवा गोल केला. विनोद कुमार पांडे ने 86 व्या मिनिटाला 10 व गोल केला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा