ज्युव्हेंटसच्या सराव सत्रात रोनाल्डोची हजेरी

रोम – पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्टियनो रोनाल्डो हा अंतरराष्ट्रीय सुट्टीनंतर पुन्हा इटालियन क्‍लब ज्युव्हेंटसच्या सर्व सत्रात सामील झाला आहे. नेशन्स लीगच्या सामन्यांसाठी त्याला पुर्तुगाल संघातून 4 सामन्यांसाठी विश्रंती देण्यात आली होती. पोर्तुगालचा संघ नेशन्स कपची उपान्त्यफेरी गाठू शकला नाही. त्यामुळे रोनाल्डो पुन्हा ज्युव्हेंटस संघासह जोडला गेला आहे. याबाबतची माहिती ज्युव्हेंटस मधील त्याचा सहकारी खेळाडू माटीया डी स्किग्लिओ याने एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिली.

आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सुट्टी मिळाल्यामुळे रोनाल्डो पोर्तुगाल साठी उपलब्ध होता. परंतु, खाजगी कारणांसाठी त्याने राष्ट्रीय संघातून सुट्टी घेऊन तो लंडनमध्ये होता. यावेळी त्याने त्याची मैत्रीण गॉर्जिना रोड्रिगेजशी साखरपुडा केल्याचीदेखील चर्चा होत आहे. रोनाल्डोचा साखरपुडा आणि त्याला बॅलोन डी ऑर पुरस्काराच्या पहिल्या तीन खेळाडूच्या स्थान न मिळाल्याच्या चर्चांविषयी माटीया डी स्किग्लिओने सांगितले की, मला याबाबत काही माहिती नाही. मी तुम्हाला फक्त इतकेच सांगू शकतोय की, एसपीईएल विरुद्धच्या पुढील आयोजीत ज्युव्हेंटसच्या सराव सत्रात रोनाल्डोने हजेरी लावली आहे.

ज्युव्हेंटसचा पुढील सामना एसपीईएल विरुद्ध घरच्या मैदानावर आहे. त्यानंतर ते स्पॅनीश क्‍लब वेलेंसिया विरुद्ध चॅम्पियन्स लीगचा महत्त्वपुर्ण सामना खेळतील. या अगोदरच्या चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात मॅंचेस्टर युनाइटेड विरुद्ध त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जोवे लागले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)