विराटला डवचल्यास तुमचे काही खरे नाही : फाफ ड्यु प्लेसीस

ऑस्ट्रेलियन संघाला अफ्रिकेच्या कर्णधाराचा सल्ला

मेलबर्न – भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ येत्या 21 नोव्हेंबर रोजी समोरा-समोर येणार असून फक्त भारत किंवा ऑस्ट्रेलियात या मालिकेबद्दल चर्चा नसून जगभरात या मालिकेबद्दल उत्सूकत आहे. त्यातच दक्षिण अफ्रीकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसीसने ऑस्ट्रेलियाच्या संघाला सल्ला दिला असून यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाला विराट कोहलीशी थेट पंगा घेऊ नका असा सल्ला दिला आहे.

-Ads-

यावेळी बोलताना तो म्हणालेआ की, ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात कायम आक्रमक असतो, पण तसे असले तरीही मला वाटते त्यांच्या संघाने विराटशी पंगा घेऊ नये. विराट हा आक्रमक खेळाडू आहे. आणि तो सध्या चांगल्या लयीत आहे. त्यामुळे त्याच्याशी मैदानावर पंगा घेऊ नका. त्याऐवजी मैदानावर संयम राखा, असा सल्ला त्याने दिला आहे. आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना मैदानात प्रतिस्पर्धी खेळाडूशी पंगा घ्यायला आवडतो. पण विराट हा लयबद्ध खेळ करणारा खेळाडू आहे. त्यालादेखील आक्रमकपणा आवडतो. त्यामुळे त्याला चिथवू नका, असेही ड्यु प्लेसिस यावेळी म्हणाला.

तसेच पुढे बोलताना तो म्हणाला की, या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या मालिकेत आम्ही शांतपणे विराटचा सामना केला. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये काही खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यांशी भिडायला आवडते त्याने त्यांच्या कामगिरीत सुधारणा होते. अश्‍याच वृत्तीचा खेळाडू हा विराट कोहली आहे.त्यामुळे आम्ही अगदी शांतपणे विराटला सामोरे गेलो. त्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं भारताला 2-1 अश्‍या फरकाने नमवले होते. त्यात विराट कोहलीने तीन कसोटी सामन्यांत 47.66 च्या सरासरीनं 286 धावा केल्या होत्या, असं उदाहरणही डु प्लेसिसने यावेळी बोलताना दिले.

प्रत्येक संघात अशा प्रकारचे एक-दोन खेळाडू आहेत. त्यांचा सामना करण्याआधी आम्ही त्यांच्याबद्दल चर्चा करून शांत राहण्याची रणनिती आखतो. विराट कोहली जबरदस्त खेळाडू आहे. आम्ही त्याच्यासमोर शांत राहिलो. त्यानं निश्‍चितच धावा केल्या, पण खूप जास्त नाहीत, असेही ड्यु प्लेसिस म्हणाला.

दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-ट्‌वेंटी, चार कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. पहिला टी-ट्‌वेंटी सामना 21 नोव्हेंबरला होणार आहे. या स्पर्धेतील टी-20 सामन्यात भारतीय संघ प्रथमच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थीतीत खेळताना दिसून येणार आहे. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघात डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मीथ हे दोन मातब्बर खेळाडू नसणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
23 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
1 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)