आफ्रिकेची कसोटी मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी

केपटाऊन – डेल स्टेन आणि कगिसो रबाडा यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 9 गडी राखून पराभवकरत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिकेतील एक कसोटी सामना अजून बाकी आहे.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 177 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 431 धावा करत 254 धावांची आघाडी घेतली होती.

प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात सर्वबाद 294 धावांपर्यतच मजल मारू शकला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 43 धावांचे आव्हान मिळाले. विजयासाठी 43 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 1 गडी गमावत सहज पार केले आणि मालिकेत सलग दुसरा विजय नोंदवला.

दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात फलंदाजीमध्ये फाफ डु प्लेसीने सर्वाधिक 103 धावा केल्या. तर सामन्यात गोलंदाजीत पहिल्या आणि दुसऱ्या डावात मिळून डेल स्टेनने एकूण 7, कगिसो रबाडाने 6, डुएन ओलिवरने 5 आणि वेरनॉन फिलेंडरने 2 गडी बाद केले. फाफ डू प्लेसीसला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)