व्हेकेशन्स कॉर्पोरेट लीगमधे 16 संघ सहभागी होणार

पुणे – सत्य प्रकाश जोशी ग्रुप यांच्या तर्फे 5व्या सत्यम व्हेकेशन्स कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले  आहे. हि स्पर्धा व्हेरॉक क्रिकेट मैदान आणि लिजेंड्‌स क्रिकेट मैदान येथे 16 मार्च पासून सुरु होणार आहे.

स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले असून यामध्ये वेंकीज(गतविजेता), एसपीजे ग्रुप(गत उपविजेता), अँमडॉक्‍स, सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, किर्लोस्कर ब्रदर्स, विप्रो, एलटीआय, टिएटो, अमेझॉन, वाईन एन्टरप्रायझेस, सीएलएसए टेक्‍नॉलॉजीज, टीसीएस, अर्न्स्ट अँड यंग, सिमेंटक, हार्मन, हनीवेल यांचा समावेश आहे.

स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. तसेच, साखळी फेरीत प्रत्येक संघ 30सामने खेळणार असून प्रत्येक गटांतील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 50हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 30हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय मालिकावीर खेळाडूला करंडक व 10 हजार रुपये, सर्वोत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 5मे रोजी होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)