पुना क्‍लब, क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघांचा मोठा विजय

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा

पुणे – पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब यांच्या तर्फे पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पुना क्‍लब संघाने क्रिकेट मास्टर्स अकादमी संघाचा तर क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने युनायटेड क्रिकेट क्‍लब संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

पुना क्‍लब येथे झालेल्या या सामन्यात साखळी फेरीत हृतिक उत्तेकरच्या भेदक गोलंदाजीच्या दोरावर पुना क्‍लब संघाने क्रिकेट मास्टर्स अकादमी संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना हृतिक उत्तेकर व भार्गव पाठक यांच्या अचूक व आक्रमक गोलंदाजीपुढे क्रिकेट मास्टर्स अकादमी संघ केवळ 38.3 षटकात सर्वबाद 109 धावांत गारद झाला. साहिल अभंगने 22 तर प्रितम बंहालेने 20 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला.

हृतिक उत्तेकरने 18 धावात तर भार्गव पाठकने 33 धावांत 3 गडी बाद केले तर विराज मेहेत्रे , अभिषेक कुलकर्णी व ओम माळी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. 109 धावांचे लक्ष गौरव खांदवेच्या नाबाद 37 व विराज मेहेत्रेच्या नाबाद 34 धावांसह पुना क्‍लब संघाने केवळ 23.3 षटकात 2 गडी गमावत 110 धावांसह पुर्ण करत विजय संपादन केला. 18 धावांत 3 गडी बाद करणारा हृतिक उत्तेकर सामनावीर ठरला.

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या सामन्यात क्रिश शहापुरकारच्या अफलातून आष्टपैलु कीमगिरीच्या जोरावर क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने युनायटेड क्रिकेट क्‍लब संघाचा 38 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना क्रिश शहापुरकारच्या दमदार 147 धावांच्या जोरावर क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने 45 षटकात 6 बाद 256 धावांचा डोंगर रचला.

256 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओमकार काळेच्या 53 धावा संघाला विजय मिळवून देण्यात असमर्थ ठरल्या व क्रिश शहापुरकरच्या अचूक गोलंदाजीपुढे युनायटेड क्रिकेट क्‍लब संघ 43.2 षटकात सर्वबाद 218 धावांत गारद झाला. क्रिशने केवळ 37 धावा देत 3 गडी बाद केले. साहिल कड व पार्थ कांबळे यांनी प्रत्येकी 2 तर रिध्देश भुरूक व अभिजीत मेचे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल –

साखळी फेरी : क्रिकेट मास्टर्स अकादमी – 38.3 षटकात सर्वबाद 109 धावा(साहिल अभंग 22, प्रितम बंहाले 20, पार्थ बोत्रे 15, हृतिक उत्तेकर 3-18, भार्गव पाठक 3-33, विराज मेहेत्रे 1-4, अभिषेक कुलकर्णी 1-24, ओम माळी 1-12) पराभूत वि पुना क्‍लब- 23.3 षटकात 2 बाद 110 धावा(गौरव खांदवे नाबाद 37, विराज मेहेत्रे नाबाद 34, श्रियांक जैन 2-11) सामनावीर- हृतिक उत्तेकर

पुना क्‍लब संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.

क्‍लब ऑफ महाराष्ट्र- 45 षटकात 6 बाद 256 धावा(क्रिश शहापुरकार 147(159), साहिल कड 21, यश जयभाय 2-43, समर्थ वाबळे 1-47, अंकित बढे 1-40) वि.वि युनायटेड क्रिकेट क्‍लब- 43.2 षटकात सर्वबाद 218 धावा(ओमकार काळे 53, रणवीर सिंग चौहाण 39, क्रिश शहापुरकर 3-37, साहिल कड 2-25, पार्थ कांबळे 2-47, रिध्देश भुरूक 1-37, अभिजीत मेचे 1-0) सामनावीर- क्रिश शहापुरकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)