नायर इगल्स्‌, राठोड रॉयल्स्‌ संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला

लायन्स्‌ प्रिमियर लीग अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे – नायर इगल्स्‌ आणि राठोड रॉयल्स्‌ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करताना लायन्स्‌ क्‍लब डिस्ट्रीक 323 डी-2 तर्फे आयोजित “लायन्स्‌ प्रिमियर लीग अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस गाजवला. यावेळी राठोड रॉयल्स्च्या हिकांत कामदार याने पहिल्याच दिवशी शतक नोंदविताना चमकदार कामगिरीची नोंद केली.

-Ads-

उद्‌घाटनाच्या सामन्यात अभिषेक मोहीतेच्या नाबाद 83 धावांच्या जोरावर नायर इगल्स्‌ संघाने शिवनेरी लायन्स्‌ संघाचा 9 गडी राखून सहज पराभव केला. शिवनेरी लायन्स्‌ संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 183 धावा केल्या. यामध्ये संतोष पाटोळे (44 धावा) आणि साजन मोदी (48) यांनी संघाच्या डावाला आकार दिला.

यावेळी तिसऱ्या गड्यासाठी संतोष आणि साजन यांनी 52 चेंडूत 70 धावांची भागिदारी केली. हे आव्हान नायर इगल्स्ने 19.2 षटकात व 1 गडी गमावून पूर्ण केले. अभिषेक मोहीते याने नाबाद 83 धावांची खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. अभिषेक याने नितेश गुंदेचा (65 धावा) याच्यासाथीत 109 चेंडूत 162 धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला.

तर, दुसऱ्या सामन्यात हिकांत कामदारच्या नाबाद 117 धावांच्या जोरावर राठोड रॉयल्स्‌ संघाने नाईक पलटण संघाचा 39 धावांनी पराभव केला. हिकांतच्या दणदणीत खेळीच्या जोरावर राठोड रॉयल्स्‌ संघाने 20 षटकात 4 गडी गामवून 200 धावांचा डोंगर उभा केला. हिकांत याने महावीर ओस्वाल (35 धावा) याला साथीला घेत चौथ्या गड्यासाठी 62 चेंडूत 92 धावांची भागिदारी रचली. या आव्हाला उत्तर देताना नाईक पलटण संघाचा डाव 20 षटकात 161 धावांवर मर्यादित राहीला.

डेक्कन जिमखाना मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन डिस्ट्रीक गव्हर्नर 3234 डी-2चे रमेश शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी ओमप्रकाश पेठे, अभय शास्त्री, माजी रणजीपटू कैलाश गट्टानी व माजी रणजीपटू चंद्रशेखर जोशी, डिस्ट्रीक क्रिकेटचे मुख्य वसंतभाऊ कोकणे आणि भुपेंदरसिंग धुल्लट आदि मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकालः

1) शिवनेरी लायन्स 20 षटकांत 6 बाद 183 (संतोष पाटोळे 44, साजन मोदी 48, सचिन नलावडे 2-55) पराभूत वि. नायर इगल्स 19.2 षटकांत 1 गडी बाद 184 (अभिषेक मोहीते नाबाद 83, नितेश गुंदेचा 65); सामनावीरः अभिषेक मोहीते;

2) राठोड रॉयल्सः 20 षटकांत 4 बाद 200 (हिकांत कामदार नाबाद 117, महावीर ओस्वाल 35, समीर तांबोळी 4-25) वि.वि. नाईक पलटणः 20 षटकात 8 बाद 161 (अमित पारले 52, पुष्कराज जोशी 58, सचिन कापडे 3-17, विनय निंबाळकर 2-27).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)