‘पृथ्वी शॉ’ आणि ‘हनुमा विहारी’ची चमकदार कामगिरी

भारत अ – न्युझीलंड अ कसोटी मालिका

माऊंट माऊगाऊनी – न्युझीलंड अ विरुद्ध भारत अ दरम्यान होत असलेल्या पहिल्या अनधिकृत चार दिवसांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दिवशीच्या खेळात भारत अ संघाने दिवस अखेर 5 बाद 340 धावांची मजल मारली असून पहिल्या दिवशीच्या खेळात सलामीवीर पृथ्वी शॉ, हनुमा विहारी आणि पार्थिव पटेल यांनी चांगली कामगिरी केली. तर संघातील अनुभवी खेळाडू मुरली विजय आणि अजिंक्‍य रहाणे यांना पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे.

-Ads-

भारतीय संघ आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापुर्वी भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांना सराव करता यावा या करिता न्युझीलंड अ विरुद्ध होत असलेल्या अनधिकृत कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत अ संघात निवड करण्यात आलेल्या पृथ्वी शॉ, अजिंक्‍य रहाणे, मुरली विजय, हनुमा विहारी आणि पार्थिव पटेल यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा होत्या. त्यात सलामीवीर पृथ्वी शॉने वेस्त इंडीजविरुद्धच्या मालिकेतील आपला फॉर्म कायम राखत न्युझीलंड अ विरुद्ध भारत अ संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली.

मात्र, दुसऱ्या बाजुने खेळणारा भारतीय संघाचा दुसरा सलामीवीर केवळ 28 धावा करुन परतला. तर, शतकी सुरुवात करुन दिल्यानंतर पृथ्वी शॉ देखिल 62 धावा करुन परतला. तर मयंक अग्रवाल देखिल 108 चेंडूत 65 धावांची चमकदार खेळी करुन बाद झाल्यानंतर आलेला कर्णधार अजिंक्‍य रहाणे केवळ 12 धावांची खेळी करुन बाद झाला.

तर, त्यानंतर हनुमा विहारी आणि पार्थिव पटेलने संघाचा डाव सावरताना आपापली अर्धशतके पूर्ण करत 138 धावांची भागिदारी केली. यावेळी दिवसाचे अखेरचे षटकातील चौथ्या चेंडूवर हनुमा विहारी 86 धावांवर असताना बाद झाला. त्यामुळे दिवसाचा खेळ थांबवला. यावेळी पार्थिव पटेल 79 धावांवर खेळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)