खेळाडूंच्या रोटेशन पद्धतीचा वापर करणार – एम.एस.के. प्रसाद

मुंबई – विश्‍वचषक स्पर्धा आणि आयपीएल स्पर्धा यांच्या मधिल वेळापत्रक आणि त्यामुळे खेळाडूंवर येणारा ताण लक्षात घेऊन आयपीएलमध्ये संभाव्य खेळाडूंचा वापर हा रोटेशन पद्धती नुसार केला जाणार असून अशा पद्धतीमुळे विश्‍वचषक
स्पर्धेच्या वेळी खेळाडूंना कोणताही ताण जानवणार नाही. असे प्रतिपादन निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी
केले आहे.

यावेळी बोलताना प्रसाद म्हणाले की, विश्‍वचषक स्पर्धा काही महिन्यांवर आहे. त्यापुर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका तसेच आयपीएल ही स्पर्धा खेळणार आहे. त्यामुळे खेळाडूंवर या व्यस्त वेळापत्रकाचा ताण पडू शकतो आणि त्याचे दुष्परिणाम भारतीय संघाला विश्‍वचषक स्पर्धेत भोगावे लागू शकतात. त्यामुळे आम्ही त्यावर तोडगा म्हणुन आयपीएल मधील संघ मालकांशी बोलून त्यांना आवश्‍यक विश्रांती मिळावी या साठी संघात रोटेशन पॉलिसीचा अवलंब करावा अशी मागणी आम्ही केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र, विश्‍वचषकासाठीच्या संघात कोणाला जागा मिळणार यावरुन तयार झालेला संभ्रम अद्यापही कायम असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा आणि 23 मार्चपासून सुरु होणारे आयपीएल लक्षात घेता, विश्‍वचषकासाठी संभाव्य 18 खेळाडूंची यादी तयार असून गरजेनुसार खेळाडूंना संधी दिली जाईल असे स्पष्टीकरणही यावेळी प्रसाद यांनी दिले आहे.

विश्‍वचषक लक्षात घेता आयपीएलचे संघमालक आपल्या संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणार का? याबद्दल अद्याप ठोस काहीही निर्णय झाला नाही. मात्र, याआधी भारतीय संघातल्या खेळाडूंनी अतिक्रिकेटमुळे येणाऱ्या ताणाबद्दल चिंता व्यक्त केली असल्यामुळे यावर उपाय शोधणे बीसीसीआयसाठी महत्वाचे झाले आहे. 24 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)