ढोले पाटील महाविद्यालयाचा सहज विजय

पुणे -गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीनंतर फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ढोले पाटील महाविद्यालयाने अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचा पराभव करताना आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली.

प्रथम फलंदाजी करताना अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या संघाने निर्धारित 19 षटकांत 5 गडीबाद 125 धावांची मजल मारत ढोले पाटील कॉलेजच्या संघासमोर विजयासाठी 126 धावांचे आव्हान ठेवले होते.

प्रत्युत्तरात खेळताना ढोले पाटीलच्या संघाने 17.3 षटकांत 5 बाद 126 धावा करत हे आव्हान पूर्ण करत आगेकूच नोंदवली. यावेळी ढोले पाटीलच्या संघाकडून रोहन भडकेने नाबाद 55 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)