मुकूंदनगर ब्लास्टर्स, औंध फायटर्स यांचा उपान्त्यफेरीत

‘यशोधन पुणे माहेश्‍वरी प्रीमियर लीग अजिंक्‍यपद’ क्रिकेट स्पर्धा

पुणे – मुकूंदनगर ब्लास्टर्स आणि औंध फायटर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून येथे सुरू असलेल्या पुणे जिल्हा माहेश्‍वरी प्रगति मंडळ जिल्हा युवा समिती तर्फे आयोजित “यशोधन पुणे माहेश्‍वरी प्रीमियर लीग अजिंक्‍यपद’ क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेहरू स्टेडियम मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत राजिव मलानी याच्या खेळीच्या जोरावर मुकूंदनगर ब्लास्टर्स संघाने खडक चॅलेंजर्सचा 5 गडी राखून सहज पराभव केला. खडक चॅलेंजर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 12 षटकात 6 गडी गमावून 68 धावा केल्या. यामध्ये कुणाल जामवार 27 व कन्हय्या लढ्ढा 15 यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली.

राजिव मलानी (31) आणि निखील लाहोटी (11) यांच्या फलंदाजीच्या जोरावर मुकूंदनगर ब्लास्टर्स संघाने हे आव्हान 11.5 षटकात व 5 गडी गमावून पूर्ण करत उपांत्य फेरी गाठली. तर, दुसऱ्या सामन्यात रोहीत राठीच्या 45 धावांच्या जोरावर औंध फायटर्सने बिबवेवाडी वॉरीयर्सचा 4 गडी राखून सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)