स्टॅलियन्स, रॉयल्स, एसबीएच स्मॅशर्स संघानी उदघाटनाचा दिवस गाजवला

सहावी अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग स्पर्धा

पुणे – स्टॅलियन्स, रॉयल्स, कल्याणीवाला अँड मिस्त्री, एसबीएच स्मॅशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेत उदघाटनाचा दिवस गाजवला. कटारिया हायस्कुल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे सुरु झालेल्या या स्पर्धेत चंकीत धनुकाच्या उपयुक्त 26 धावांच्या खेळीच्या जोरावर एसबीएच स्मॅशर्स संघाने एसपीसीएम स्ट्रायकर्सचा 7 गडी राखून पराभव केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रथम फलंदाजी करताना विश्वजीत चव्हाण 15, रिषभकुमार भन्सारी 10, सीए संकेत नाहाटा 10 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर एसपीसीएम स्ट्रायकर्स संघाला 8 षटकात 4 बाद 44 धावाच करता आल्या. एसबीएच स्मॅशर्स संघाने हे आव्हान 5.2 षटकात 3बाद 45धावा करून पूर्ण केले. यात चंकीत धनुकाने 15 चेंडूत नाबाद 26 धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुसऱ्या सामन्यात सीए आत्मन बागमार (नाबाद 33 धावा व 1-18)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रॉयल्स संघाने बीस्मार्ट संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना बीस्मार्ट संघाने 8 षटकात 4 बाद 84 धावा केल्या. यामध्ये किशन जैनने 20 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांसह 49 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.

रॉयल्स संघाने हे आव्हान 7.2 षटकात 5 गड्यांच्या बदल्यात 85 धावा काढून पूर्ण केले. सीए आत्मन बागमारने 17 चेंडूत नाबाद 33 धावा व पार्थ पाडियाने 14 चेंडूत 23 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. अन्य लढतीत चिन्मय बिडकरच्या नाबाद 57 धावांच्या खेळीच्या जोरावर कल्याणीवाला अँड मिस्त्री संघाने सी अँड स्टायकर्स संघावर 66 धावांनी विजय मिळवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)