विजय शंकर आणि शुभमन गिल यांची भारतीय संघात वर्णी

नवी दिल्ली – हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत क्रिकेट खेळण्यास बंदी असल्याने त्यांच्याऐवजी तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर आणि पंजाब संघाचा मुख्य खेळाडू शुभमन गिल यांची उर्वरित ऑस्ट्रेलिया दौरा आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. विजय शंकरला हार्दिक पांड्याच्या बदली खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. तर, शुभमन गिल लोकेश राहुलची जागा भरून काढेल.

याबाबत एक स्टेटमेंट काढून बीसीसीआयने ही माहिती दिली, हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल हे मायदेशी परतत असल्याने त्यांचे बदली खेळाडू म्हणून निवड समितीने विजय शंकर आणि शुभमन गिल यांना निवडले आहे. विजय शंकर हा ऍडलेड येथे होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापासून न्यूझीलंड दौऱ्यासाठीही संघात असेल तर गिलला न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी- 20 सामन्यासाठी निवडण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकेश राहुलच्या सलामीच्या जागेसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या मयांक अगरवालचा प्रथम विचार करण्यात आला होता. परंतु, तो सध्या जायबंदी असून त्याची दुखापत वाढू नये म्हणून काळजी घेत त्याची निवड करण्यात आली नाही. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांसाठी फक्त शंकरचे निवड करण्यात आली आहे.

शुभमन गिलकडे खूप प्रतिभावान खेळाडू म्हणून पहिले जाते. रणजी चषकात पंजाबसाठीच खेळणारा युवराज सिंग यानेही त्याचे कौतुक केले असून त्याचे भारतीय संघातील भविष्य उज्ज्वल असल्याचे त्याने सांगितले आहे. युवराज म्हाणाला, तो एक प्रतिभावान तरुण खेळाडू आहे. ज्याची फलंदाजी पाहणे मला खूप आवडते. भारतीय संघासाठी अनेकवर्षे खेळण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. तो या संधीचे कश्‍या प्रकारे फायदा उचलतो यावरही खूप काही निर्भर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)