सिमेंस संघाचा मोठा विजय

15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धा

पुणे – दिपक कुमारच्या आक्रमक अष्टपैलु कामगिरीच्या बळावरसिमेंस संघाने टॅलेंटीका संघाचा आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत पराभव केला तर केपीआयटी संघाने झेन्सर संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मौदानावर झालेल्या सामन्यात दिपक कुमारच्या आक्रमक अष्टपैलु कामगिरीच्या बळावर सिमेंस संघाने टॅलेंटीका संघाचा 169 धावांनी दणदणीत पराभव केला. प्रथम खेळताना दिपक कुमारच्या जलद शतकी खेळीच्या जोरावर सिमेंस संघाने 20 षटकात 9 बाद 217 धावांचा डोंगर रचला.

दिपक कुमारने आक्रमक फलंदाजी करत केवळ 59 चेंडूत शतक ठोकले. 217 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिपक कुमार, निखिल पाटील व मनोज भागवत यांच्या अचूक गोलंदाजीपुढे टॅलेंटीका संघ केवळ 10.2 षटकात सर्वबाद 48 धावांत गारद झाला. 59 चेंडूत 100 धावा व 20 धावांत 2 गडी बाद करणारा दिपक कुमार सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत मयुरेश लिखितेच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर केपीआयटी संघाने झेन्सर संघाचा 4 गडी राखून पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

सिमेंस- 20 षटकात 9 बाद 217 धावा(दिपक कुमार 100(59), नमन शर्मा 23(14), निरज राय 2-45, अनुभव अरोरा 2-29, राहुल मुदपल्लीवार 2-31) वि.वि टॅलेंटीका- 10.2 षटकात सर्वबाद 48 धावा(गौरव शर्मा 21(21), दिपक कुमार 2-20, निखिल पाटील 2-5, मनोज भागवत 2-11) सामनावीर- दिपक कुमार
सिमेंस संघाने 169 धावांनी सामना जिंकला.

झेन्सर- 20 षटकात 8 बाद 152 धावा(अकिब पिरझादे 50(36), धवल समरनायके 35, बुर्हानउद्दीन भरमल 2-31, अंबर दांडगवल 3-27) पराभूत वि केपीआयटी- 16.5 षटकात 6 बाद 153 धावा(अलोक नागराज 56(41), मयुरेश लिखिते 35(18), परिक्षीत केनी 27(19), अकिब पुरझादे 2-19) सामनावीर- मयुरेश लिखिते
केपीआयटी संघाने 4 गडी राखून सामना जिंकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)