पुढील सामन्यात आमचा खेळ आणखी बहरेल : शाकिब

चितगाव  – बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशने फिरकीपटूंच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा 64 धावांनी पराभव केला.

विक्रमी कामगिरीकरत विजय मिळवल्यानंतर बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन याने सांगितले की, हा सामना आम्ही जिंकला असला तरी पुढील सामन्यात आणखी चांगला खेळ करू. या कसोटीमध्ये 5 बळी घेत त्याने बांगलादेशच्या विजयात महत्वाचा वाटा तर उचललाच पण त्याचबरोबर त्याने 200 कसोटी बळींचा टप्पा देखील गाठला. अशी कामगिरी करणारा तो बांगलादेशचा पहिला खेळाडू बनला आहे.

शाकिब दुखापतीनंतर या मालीकेतून पुनरागमन करत आहे. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, मी दोन महिन्यानंतर पुनरागमन करत आहे. त्यातच मी पुरेसा सराव देखील करू शकलो नाही. फलंदाजीचे तीन सत्र एवढाच मी सराव केला होता. हा सामना माझ्यासाठी खूप खडतर होता. परंतु, या सामन्यात मी चांगली कामगिरी केली त्यामुळे समाधानी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)