स्टेम, इक्‍यु टेक्‍नॉलॉजीक संघांची आगेकूच कायम

पुणे  -स्टेम, इक्‍यु टेक्‍नॉलॉजीक, टीम वन आर्किटेक्‍टस, बुर्हानी प्रायव्हेट लिमिटेड या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून येथे सुरू असलेल्या ई2डी स्पोर्टस्‌ यांच्या तर्फे आयोजित एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत साखळी फेरीत आगेकूच नोंदवली.

ई2डी क्रिकेट मैदान, लवळे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अ गटात पहिल्या सामन्यात सिवाराम मुट्यम (नाबाद 51) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर स्टेम संघाने इनव्हेंटीज इंडिया संघावर 3 गडी राखून पराभव करून विजयी सलामी दिली. पहिल्या सामन्यात इनव्हेंटीज इंडिया संघाने 20 षटकांत 5 बाद 166 धावा केल्या. हे आव्हान स्टेम संघाने 20 षटकांत 7 बाद 169 धावा करून पूर्ण केले.

यात सिवाराम मुट्यमने 29 चेंडूत नाबाद 51 धावा करून संघाचा विजय सुकर केला. दुसऱ्या सामन्यात ब गटात दर्शन शाहने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इक्‍यु टेक्‍नॉलॉजीक संघाने सीसीपी संघावर केवळ 1 धावेने थरारक विजय मिळवला. तर, क गटात रविराज पाटीलच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर टीम वन आर्किटेक्‍टस ग्लोबकॉमचा 27 धावांनी पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)