एसपीजे कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धा : एसपीजे ग्रुप संघांचा मोठा विजयी

पुणे – एसपीजे ग्रुप संघाने हर्मन संघाचा 125 धावांनी पराभव करत येथे होत असलेल्या सत्य प्रकाश जोशी ग्रुप यांच्या तर्फे 5व्या एसपीजे करंडक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत मोठा विजय संपादन करत आगेकूच नोंदवली.

व्हेरॉक क्रिकेट मैदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत कर्णधार संजय जोशीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर एसपीजे ग्रुप संघाने हर्मन संघाचा 125 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना एसपीजे ग्रुप संघाने 20 षटकात 3 बाद 158 धावा केल्या. संजय जोशीने केवळ 53 चेंडूत 91 धावांची फटकेबाजी केली.

मंदार भंडारीने 20 चेंडूत 56 तर चंद्रकांत भारव्दाजने 34 चेंडूत नाबाद 69 धावा करून संजयला सुरेख साथ दिली. 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राज मोहिते , समिर सिंग , सागर मगर , हरी सावंत व अविनाश शिंदे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे हर्मन संघ 18 षटकात सर्वबाद 133 धावांत गारद झाला. संजय जोशी सामनावीर ठरला.

दुसऱ्या लढतीत विप्रो संघाने सिमेंटेक संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सिमेंटेक संघाचा डाव 17.2 षटकात सर्वबाद 93 धावांत अटोपला. 93 धावांचे लक्ष विशाल हिरगुडेच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर विप्रो संघाने केवळ 13.3 षटकात 4 बाद 94 धावांसह सहज पुर्ण करत विजय मिळवला. विशाल हिरगुडे सामनावीर ठरला.

अन्य लढतीत एलटीआय संघाने किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड संघाचा 5 गडी राखून पराभव केला, तर सॉफ्टहार्ड संघाने हनिवेल संघाचा 37 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)