ओमान अवघ्या 24 धावांत गारद

अल अमारत – ओमान आणि स्कॉटलंड यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यात यजमान ओमानचा संघ अवघ्या 24 धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर स्कॉटलंडने 280 चेंडू राखत एकही गडी न गमावता 26 धावा केल्या आणि हा सामना जिंकला.

25 धावांचे लक्ष्य पार कारण्यासाठी त्यांना केवळ 20 चेंडू पुरेसे ठरले. नाणेफेक जिंकून स्कॉटलंडने ओमानला फलंदाजीचे निमंत्रण दिले. स्कॉटलंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवत दुसऱ्याच चेंडूवर अलस्डेअर इव्हान्सने जतिंदर सिंगला शुन्यावर बाद केले. त्यानंतर ओमानची गळती लागली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांच्या 17.1 षटकांत सर्वबाद 24 धावा झाल्या. खावर अलीने केलेल्या 15 धावा वगळता ओमानच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यांच्या सहा फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या स्कॉटलंडने 3.2 षटकांत 26 धावा केल्या आणि 10 गडी राखून सामना जिंकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)