सराव सामन्यात महिलांचा पराभव

मुंबई – भारताच्या बोर्ड अध्यक्षीय इलेव्हन महिला संघाची डावखुरी मध्यमगती गोलंदाज कोमल झांझडने सुरुवातीला तीन बळी घेत इंग्लंड इलेव्हन संघाला अडचणीत टाकत विजयाची संधी निर्माण केली होती; परंतु अनुभवी हेदर नाईटने नाबाद 64 धावा करत विजय मिळवून दिला. बोर्ड अध्यक्षीय इलेव्हन संघाने सर्वबाद 154 धावा केल्या होत्या तर इंग्लंड इलेव्हन संघाने 8 बाद 157 धावा करत विजय संपादित केला.

प्रथम फलंदाजी करताना अध्यक्षीय इलेव्हनने आश्‍वासक सुरुवात करत 27 धावांची सलामी दिली. स्मृती मंधनाने अक्रमक खेळ करत चार चौकार लगावले; परंतु ती 19 धावा करत बाद झाली. त्यानंतर फलंदाजीस आलेली एस. मेघना एक धाव करून बाद झाल्याने संघाची अवस्था 2 बाद 29 अशी झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर नियमित अंतराने बळी गेल्याने अध्यक्षीय इलेव्हनने 49 षटके फलंदाजी करताना सर्वबाद 154 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यात मिन्नू मनीने सर्वाधिक 28 धावांचे योगदान दिले. प्रत्युतरात फलंदाजीस आलेल्या इंग्लंड इलेव्हन संघाला बीसीसीआयच्या अधिकृत सामन्यात हरियाणाविरुद्ध 8 धावा देत 9 बळी घेत प्रकाशझोतात आलेल्या कोमलने सुरुवातीलाच तीन झटके देत त्यांची अवस्था 4 बाद 11 अशी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)